Breaking
ब्रेकिंग

नळ जोडणीची लाच घेतल्या प्रकरणी शिपायला एक वर्षाचा करावास…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे ता ३० एप्रिल : ठाणे शहरात तक्रारदार विनायक मोरे यांच्या ओळखीचे विजय वाघ यांना ठाणे महानगरपालिकेकडून नवीन नळ जोडणी हवी होती याकरिता तक्रारदार यांच्यामार्फत त्यांनी महानगरपालिकेकडे नवीन नळ जोडणीसाठी अर्ज केला होता प्रकरणी जाधव यांना त्यांनी भेटून लवकरात लवकर नळ जोडणी पाहिजे असे सांगितल्याने शिपाई जाधव यांनी सदर कामाकरिता 10,000 रुपयाची मागणी केली होती पण या कामासाठी त्यांना लाच देण्याची इच्छा नव्हती या करिता त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक ठाणे या कार्यालयात अर्ज तक्रार केला होता त्यानंतर झालेल्या सापळा कारवाईत शिपाई लोकसेवक राजेश जाधव यांना 5000 रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते.

सदर खटल्याचा अंतिम निकाल मा. न्यायालयाने आज रोजी आज घोषित केला असून वरील नमूद आरोपी लोकसेवक राजेश यशवंत जाधव यांना लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7 यामध्ये एक वर्ष सश्रम कारावास व 1000/- रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच कलम 13 (1)(ड)सह 13 (2) यामध्ये 1 वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सदर तपास सापळा अधिकारी – पोनि दीपक दळवी यांनी तपास अधिकारी दीपक दळवी , पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक सरकारी वकील श्री संजय बी मोरे मार्गदर्शक श्री शिवराज पाटील डीसीपी अँटी करप्शन ठाणे अंमलदार – महिला पोलीस हवालदार 2146 अनिता उमेश पाटील , समन्स बजावणी पोहवा/ 44 25 सतीश विनायक ठाकरे यांनी केला आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे