भारतीय जनता पार्टी दिवा शहर ओ. बी. सी मोर्चा अध्यक्ष श्री रोशन प्रभाकर भगत व आदर्श महिला मंडळ अध्यक्षा सौ.सपना रोशन भगत भव्यकिल्ले बांधणीचे आयोजन व बक्षिस वितरण समारंभ…
अमित जाधव-संपादक
भारतीय जनता पार्टी दिवा शहर ओ. बी. सी मोर्चा अध्यक्ष श्री रोशन प्रभाकर भगत व आदर्श महिला मंडळ अध्यक्षा सौ.सपना रोशन भगत यांच्या सहयोगाने दिपावली निमित्त भव्य किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले होते, किल्ले परीक्षण करतेवेळी प्रत्येक्ष दिवा शहरात महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवरायांचे गडकोट अवतरल्यासारखे वाटले, अनेक कलाकारांनी उत्कृष्ट अशा गड किल्ल्याच्या ऊभेऊभ प्रतिकृती साकारल्या होत्या,सर्व कलाकारांचे, बाल कलाकांरांचे मनपुर्वक आभार , परीक्षक म्हणून समीर चव्हाण,प्रकाश पाटील, जयदीप भोईर, राजेंद्र आंब्रे, कुंदन खेडेकर, नागेश पवार यांनी उपस्थिती दर्शविली, *रोशन भगत, सपना भगत यांच्याशी स्पर्धे संदर्भात माहिती घेतली असता* लहान मुलांना, तसेच लोकांना शिवरायांचा इतिहास, प्रताप आठवावा तसेच नवीन पिढी त्यांच्या विचाराने घडावी या उद्धेशाने स्पर्धेचे आयोजन केले असे त्यांनी नमूद केलं, अनेक मान्यवरांच्या उपस्थित व कलाकारांच्या उपस्थितीत युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर आयोजित अजिंक्यतारा दशावतार पौराणिक नाटकाच्या कार्यक्रमाच्या मध्यंतराला किल्ले स्पर्धेतील कलाकारांचा रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन हजारो लोकांच्या समोर सन्मान करण्यात आला, *प्रथम क्रमांक मम्माज बॉईज(पन्हाळा) बी आर नगर, द्वितीय क्रमांक शिवबा राजा प्रतिष्ठान(राजगड)बेडेकर नगर, तृतीय क्रमांक अचानक मित्र मंडळ(खांदेरी किल्ला) साबे गाव, चतुर्थ क्रमांक तिसाई कृपा युवा मंडळ (लोहगड) गणेश पाडा, पाचवा क्रमांक हिंदवी कुलावतास प्रतिष्ठान (प्रतापगड) शोलक नगर* यांना देण्यात आले तसेच स्पर्धेतील 20 मंडळांना उतेजनार्थ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रमुखं उपस्थिती म्हणून ठाणें जिल्हा अध्यक्ष आमदार श्री निरंजनजी डावखरेसाहेब(कोकण पदवीधर मतदार संघ)विलासजी साठे साहेब ठाणे शहर संघटन सरचिटणीस,शिवाजी आव्हाड साहेब भटके विमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस, ठाणें जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सारंग जी मेढेकर, अर्चना पाटील सहसंयोजिका युवती प्रमुख ठाणे शहर जिल्हा,नरेश विष्णू पवार
ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, श्रीरमेशजी भोईर, यांचं मोलाचे सहकार्य मिळाले



