ब्रेकिंग
दिवा दातिवली स्टेशन येथे नवीन तिकिट घर सुरू,मा.उपमहापौर रमाकांत मढवी व स्थानिक मा.नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश…
अमित जाधव - संपादक
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मागणी नुसार व श्री. रमाकांत मढवी मा.उपमहापौर (ठा.म. पा )व स्थानिक नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या पाठपुऱ्याव्याने दातीवली स्टेशन(कोकण रेल्वे)येथे तिकीट घर आजपासून सुरु झाले आहे.
कोकण रेल्वे तसेच दिवा वसई ,पनवेल या मार्गावरील हे स्टेशन असून दिवा शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच दातिवली गाव येथे आहे दिवा शहराची वाढती लोकसंख्या पाहता या रेल्वे स्टेशन वर देखील नोकरदार वर्ग पनवेल , वसई रेल्वे मार्गे मोठया प्रमाणावर प्रवास करत आहेत त्यामुळे येथे तिकीट घराची वणवा पाहता शिवसेनेच्या स्थानिक मा.नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे व मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले व आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.