- केंद्रीय तसंच राज्य पुरातत्व खात्यालाही त्याची दखल घ्यावी लागली. मात्र आता अंबाबाई मंदिरात माध्यमांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. आज वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक तथा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माध्यमांनाच मंदिरात जाण्यापासून रोखलंय. मूर्ती संवर्धनाचा मुद्दा उचलल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदीचे आदेश निघाल्यानं यामागे नेमकं कारण काय याचीच सध्या चर्चा आहे.