Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकां च्या कामासाठी ५, ६ आणि ७ फेब्रुवारी दरम्यानच्या ७२ तासांच्या जम्बो मेगाब्लॉक च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत या कालावधीत पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा आढावा…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 8

ठाणे – दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकां च्या कामासाठी ५, ६ आणि ७ फेब्रुवारी दरम्यानच्या ७२ तासांच्या जम्बो मेगाब्लॉक च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत या कालावधीत पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा आढावा…

ठाणे – दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम अंतिम टप्प्यात असून मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन कडून ते युद्धपातळीवर निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येत आहे. दिनांक ४ फेब्रुवारी मध्य रात्री १२:०० नंतर ते ७ फेब्रुवारी मध्य रात्री १२:०० पर्यंत ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेऊन ठाणे ते दिवा दरम्यानच्या जलद मार्गिकां जोडण्याचे काम करण्यात येणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन कडून सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या कालावधीमध्ये मध्ये रेल्वे वरील ठाणे ते दिवा दरम्यान लोकल सेवा बंद राहणार असल्याने नागरिकांना प्रवासासाठी त्रास होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, तसेच ठाणे मनपा परिवहन, कल्याण- डोंबिवली मनपा परिवहन यांच्या वतीने ठाणे – दिवा मार्गावर जास्तीत जास्त संख्येने बस सेवा सुरु ठेऊन त्यांचे योग्यप्रकारे नियोजन करण्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना यावेळी केल्या. त्याचप्रमाणे यादरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिक वाहनांचा जास्त वापर करतील त्यामुळे रस्ते वाहतूकीवर येणारा ताण लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत रहावी याकरिता वाहतूकीच्या मार्गांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत याबाबत योग्य त्या सूचना खासदार डॉ श्रीकान्त शिंदे यांनी केल्या.

या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर, रेल्वे रिझर्व फोर्स, स्थानिक पोलिस प्रशासन, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, तसेच ठाणे महानगरपालिका आणि कल्याण – डोंबिवली मनपा आणि मनपा परिवहन प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे