बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पlची गती वाढवून पूर्ण करण्याचे निर्देश – अतिरिक्त आयुक्त, ठामपा.

अमित जाधव-संपादक

*⭕️वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पlची गती वाढवून पूर्ण करण्याचे निर्देश – अतिरिक्त आयुक्त, ठामपा*

ठाणे ( ता 8 एप्रिल, संतोष पडवळ ): ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या साकेत-बाळकुम,कोलशेत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी पाहणी करून सर्वच कामांची गती वाढवून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ठाणे शहरातील नागरिकांसाठी मनोरंजनात्मक जागा विकसित करून पर्यटनास चालना देण्यासाठी महापालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी लि.अंतर्गत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या साकेत-बाळकुम, कोलशेत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

यामध्ये कोलशेत येथे १३०० मीटर पाथवेचे काम प्रगतीपथावर असून उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच सुशोभीकरण, संरक्षण भिंती तसेच उद्यान विषयक कामे आदी कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच साकेत-बाळकूम वॉटर फ्रंट येथील कामाची पाहणी करून या परिसरात मातीचा भराव टाकून जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे,पार्किंग परिसर, सायकल ट्रॅक, हर्बल कॉर्नर, शौचालय तसेच अँम्पी थेटरची कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी मुख्य तांत्रिक अधिकारी अभियंता प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, सल्लागार, संबंधित ठेकेदार तसेच संबंधित अभियंता आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे