ब्रेकिंग
अंगणवाडी सेविकांना सरकार कडून खुशखबर,आज पर्यंत ज्या सुविधा मिळाल्या नाहीत त्या मिळणार असे समजते
अमित जाधव - संपादक
अंगणवाडी सेविकांसाठी राज्य सरकार मोठी खुशखबर देणार आहे. अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे. त्याचसोबत ग्रॅज्युएटीही दिली जाणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 1 लाख 55 हजार पासून ते 1 लाख 76 हजारापर्यंत ग्रॅज्युएटी मिळणार आहे. तर पेन्शन किती द्यायची यावरती विभागाची सल्लामसलत सुरू आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला व बालविकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळविले आहे.