Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

माध्यरेल्वेच्या कल्याण स्टेशनवर पॉइंटमॅन मुले वाचला जीव……..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म सोडलेली एक्स्प्रेस पकडण्याच्या प्रयत्नात घसरून पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण पॉईंटमनच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. धावती एक्सप्रेस पकडताना हा प्रवासी घसरून पडला होता. यावेळी प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अडकून तो ओढला जात होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पॉईंटमन शिवजी सिंग यांनी तत्काळ धाव घेत त्या प्रवाशाला तिथून खेचून बाहेर काढले. तोपर्यंत इतर प्रवाशांनी आरडाओरडा करत चेन ओढल्याने रेल्वेही थांबली होती. ही घटना स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत प्रवाशाचे प्राण वाचविणाऱ्या सिंग यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांतील ही पाचवी घटना असल्याचे सांगितले जात आहे.

सदर रेल्वे च्या अधिकाऱ्यांनी पॉईंटमॅन सिघ ने केलेल्या धाडसाचे प्रसंगवधान राखत वाचवलेल्या प्रवस्याला जीवदान देऊन देवदूत ठरले आहे अशा भावना व्यक्त करत सिंग यांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे