ब्रेकिंग
राज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधवांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मागे..
अमित जाधव - संपादक

अविनाश जाधवांकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मागे
राज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधवांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी घेत अविनाश जाधवांनी दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आतापर्यंत राज साहेबांचा आदेश आणि मार्गदर्शनाखाली काम करत आलो, यापुढे काम करत राहीन, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधवांनी दिली.