Breaking
ब्रेकिंग

दिवा हायस्कुल जवळ सिद्धांत रिजेन्सी इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील रूम मध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरीचा स्फ़ोट…

अमित जाधव - संपादक

0 2 0 6 9 9
आज दिनांक ०२/०२/२०२६ रोजी १६:०८ वाजताच्या सुमारास प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार  दिवा हायस्कूल जवळ, साबेगाव रोड, दिवा, ठाणे या ठिकाणी *सिद्धांत रिजेन्सी बिल्डिंग नंबर १* या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील *रूम क्रमांक:-३०२ (मालक:- अज्ञात)या रूममध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरीचा स्फोट होऊन आग लागली होती. *सदर घटनास्थळी शीळ अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी श्री. इंगळे सो., टोरंट कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहन व १ रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
 घरामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाची चार्जिंगला लावलेली बॅटरी ब्लास्ट होऊन आग लागली होती. सदरची आग लागल्यामुळे घरातील सोफा, फर्निचर व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळून नुकसान झाले आहे.सदर घटनास्थळी घरामध्ये लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने १६:४० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.*
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 6 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे