बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

डोंबवलीत ज्वेलर्स मालकावर प्राणघातक हल्ला,हल्लेखोर पसार….

अमित जाधव-संपादक

डोंबिवलीत दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानदारावर चाकूने हल्ला…
डोंबिवली – ज्वेलर्स दुकानात घुसून दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानदारावर अज्ञात इसमाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली.यात ज्वेलर्स दुकानदार जबर जखमी झाला असून हल्लेखोराने बुरखा घातल्याने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात त्याचा चेहरा स्पष्ट दिसला नाही.डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आगरकर रोडवरील ठाकूर वाडापाव दुकानाजवळील मन्ना ज्वेलर्स दुकानात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तारकनाथ मन्ना ( ५४) असे जखमी झालेल्या ज्वेलर्स दुकानदाराचे नाव आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास एक बुरखाधारी इसम अचानक दुकानात घुसला. तारकनाथ यांना काही समजण्याच्या आधीच अचानक बुरखाधारी इसमाने चाकूने हल्ला केला.यात तारकनाथ याचा छातीवर वार झाल्याने ते जागीच कोसळले.हल्लेखोराने दुकानातील पळ काढल्यावर दुकानाच्या बाहेर गर्दी झाली.हा हल्ला 6 ते 7 सेकंदातच झाल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे ज्वेलर्स दुकानदानात एकही सोन्याचे दागिने चोरीला गेले नाही.याचा अर्थ हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला नाही अशी माहिती रामनगर पोलिसांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे