0
2
0
9
7
4
वाहतूक पोलिसामुळे वाचले 26 मुलांचे प्राण
राज्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. तरीही निष्काळजीपणाने वागणाऱ्या लोकांची कमी नाही. आता कल्याणमधील ही घटनाचं बघा. उल्हासनगरवरून विरारच्या दिशेने एक खासगी बस निघाली होती. यात फुटबॉल अकॅडमीतील 26 मुले होती. अचानक बस वेडीवाकडी वळणे घेऊ लागल्याने वाहतूक पोलिसाने बस थांबवली. तेव्हा बस चालक मद्यधुंद अवस्थेत सापडला. त्याला 10 हजारांचा दंड ठोठवण्यात आला.
0
2
0
9
7
4



