ब्रेकिंग
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथे आयोजित कळवा, मुंब्रा आणि दिवा येथील भाजपच्या सुपर वॉरीअर्सच्या आढावा बैठकीला डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित…
अमित जाधव - संपादक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथे आयोजित कळवा, मुंब्रा आणि दिवा येथील भाजपच्या सुपर वॉरीअर्सच्या आढावा बैठकीला डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी कल्याण लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी यंदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ही टक्केवारी वाढविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मतदारसंघात चांगल्या आरोग्य सुविधा आणि नागरी सुविधा देण्याचे काम मागील १० वर्षात केले असून ही कामे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.