जोगेश्वरी येथे सालम श्री-अस्मिता चषक शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न…
अमित जाधव-संपादक
जोगेश्वरी येथे सालम श्री-अस्मिता चषक शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न
मुंबई-गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व येथील सालम जिम तर्फे मुंबई सबर्बन बॉडिबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनचल,ग्रेटर मुंबई बॉडिबिल्डिंग असोसिएशन यांच्या संयुक्त मान्यतेने नुकतच जोगेश्वरी पूर्व येथे सालम श्री शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात एकूण ११० स्पर्धकांनी भाग घेतला होता व त्यात अंकित केदारी याने सालम श्री किताब पटकावला तर मेन फिजिक्स स्पर्धेत प्रदीप घाणेकर व मास्टर्स स्पर्धेत संजय इले प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तर नोवोदितांमध्ये देवेंद्र सावंत या होतकरू स्पर्धकाने अस्मिता चषक-सालम श्री वर आपले नाव कोरले.स्पर्धेसाठी नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर राजन चाचड, दीपक खानविलकर (अस्मिता ट्रस्ट), स्थनिक आमदार सुनील प्रभू, स्थानिक नगरसेवक पंकज यादव, ऍड विक्रम रोठे, नंदू खानविलकर,शिवसेनेचे पदाधिकारी अजित भोगले, स्नेहा गोलतकर, अंकीत प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.दरवर्षी विभागातील मेहनती व होतकरू मुलांसाठी ज्यांना बॉडिबिल्डिंग मध्ये पुढे यायचं आहे आम्ही अशा स्पर्धा भरवीत असल्याचे सालम जीमचे संचालक सूर्यकांत सालम यांनी सांगितले.


