दिव्यातील शिवसेनेचे मा.उप महापौर व कार्यसम्राट मा.नगरसेवक रमाकांत मढवीजी यांचा जन्मदिवस सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात संपन्न….
अमित जाधव-संपादक
दिव्यातील शिवसेनेचे मा.उप महापौर व कार्यसम्राट मा.नगरसेवक रमाकांत मढवी जी यांचा जन्मदिवस सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात संपन्न….
अनेक संघटना व राजकीय पक्षाने दिल्या शुभेच्छा…
दिवा शहरातील शिवसेनेचे धडाडीचे मा.नगरसेवक,मा.उपमहापौर मा. रमाकांत मढवीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज विविध कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती अणेक सामाजिक संघटना,संस्था,मित्र मंडळ व इतर राजकीय पक्षांनी त्यांना शुभेच्छा देत विभागात आरोग्य शिबीर,मोफत बँक खाते ,इ श्रम कार्ड असे अणेक उपक्रम राबविण्यात आले
दिवा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प घेऊन सतत कार्यरत असणारा ,विकासाची दूरदृष्टी लाभलेला संयमी व शांत स्वभावाच्या व्यक्तीमहत्व लाभलेला असा उत्कृष्ट नगरसेवक रमाकांत मढवी जी यांच्या जन्मदिनी दिव्यातील तमाम दिवावासीयांनी व शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या असे शिवसेनेच्या पदाधिकारी निलेश म्हात्रे यांनी सांगितलं.
दिव्यातील अनेक कामाचा देखील शुभारंभ करून काही काळापासून मागणी होत असलेली सार्वजनिक शौचालय दिवा अगासन रस्त्यावर आज मा.मढवी साहेबांच्या हस्ते उदघाटन करून सुरू करण्यात आले सादर शौचालय ठाणे महापालिका अंतर्गत दिवा शिवसेना नगरसेवकांच्या निधीतून उभारण्यात आली आहे यामुळे सर्वसामान्य दिवेकरांनी आनंद व्यक्त आभार मानले
तसेच यानिमीत्ताने दिवा साबे गाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी श्री निलेश पाटील आणि सौ.अर्चना पाटील यांच्यावतीने दोन शाखा सुरु करण्यात आल्या.या शाखेचे उद्घाटन श्री रमाकांत मढवी यांच्या हस्ते झाले.गणेश मंदीर,साबे स्मशान भुमी आणि यशोदा पाटील नगर,साई संकुल,साबेगाव दिवा (पुर्व) या दोन ठिकाणी शाखेचे उदघाटन झाले.सामाजिक कार्य करतानाचा आता पक्षवाढही महत्वाची असल्याने श्री निलेश पाटील यांनी सुयोग्य रित्या नियोजन केले.साबेगावातील सर्व जनतेला त्यांच्या समस्या मांडता याव्यात,लोकांना संपर्क साधता यावे यासाठी या शाखा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
रात्री उशिरा प्रयन्त असंख्य कार्यकर्ते पुष्पगुच्छ घेऊन शुभेच्छा देण्यासाठी येत होते यात महिला वर्गाचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग होता असे दिसून आले.