शिवसेना प्रणित भटके विमुक्त जाती जमाती सेनेच्या पदाधिकारी नव नियुक्ती सोहळा…
अमित जाधव - संपादक

शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, खासदार मा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना प्रणित भटके विमुक्त जाती जमाती सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा बाळासाहेब किसवे साहेब यांच्या हस्ते आनंद आश्रम ठाणे येथे बुधवार दिनांक २३ आँक्टोंबर २०२४ रोजी युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेना पक्षात प्रवेश केला.
याचबरोबर शिवसेना प्रणित भटके विमुक्त जाती जमाती सेना ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मा. कपिल रोडे यांनी प्रदेशाध्यक्ष मा. बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव नियुक्त्या करण्यात आल्या.
दौलत समुखे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ,
राजेश मघाडे दिवा शहर अध्यक्ष ,निखिल साबळे दिवा शहर सचिव ,मंगेश इंगळे दिवा शहर संपर्क प्रमुख ,राज गायकवाड दिवा शहर सोशल मिडिया अध्यक्ष ,भावेश मेहरा दिवा शहर सोशल मिडिया उपाध्यक्ष,जितेंद्र सोनवणे दिवा शहर संघटक, आदी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष मा. बाळासाहेब किसवे यांनी मार्गदर्शन करुन त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या