दिव्यात उद्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) “होय मीच होणार दिव्याची होम मिनिस्टर” आणि भव्य हळदी कुंकू समारंभ…
अमित जाधव - संपादक
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दिव्यात रंगणार “होय मीच होणार दिव्याची होम मिनिस्टर” कार्यक्रमात आकर्षित बक्षिसांचा होणार वर्षाव. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवा शहराच्या वतीने दिवा शहरातील महिलांसाठी रविवार दिनांक ४ फेब्रुवारी सायंकाळी ६ः०० वाजता शहरप्रमुख सचिन पाटील, युवासेना शहर अधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर प्रमुख तेजस पोरजी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका अंकिता विजय पाटील, विभागसंघटिका मयुरी तेजस पोरजी, कोजागिरी अभिषेक ठाकूर, तृप्ती सचिन पाटील व महिला आघाडी तर्फे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमा दरम्यान *”होय मीच होणार दिव्याची होम मिनिस्टर”* ह्या महिलांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता, श्री स्वामी समर्थ नागनाथ मंदिर, दिवा (पूर्व) येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवण्यात आली आहे पैठणी, सोन्याची नथ, चांदीचे पैंजण बक्षीस ठेवण्यात आले आहेत तसेच उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ मध्ये वॉशिंग मशीन आणि इतर बक्षीस देण्यात येणार आहेत. तरी दिवा शहरातील जास्तीत जास्त माता-भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद लुटावा असे आवाहन शहरप्रमुख सचिन पाटील यांनी केले आहे.