ब्रेकिंग
ठाकरेंच्या शिवसेनेची यादी जाहीर, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा…
अमित जाधव - संपादक

यादी जाहीर करताच नेत्याने दिला राजीनामा
शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीची यादी जाहीर करताच पक्षातील सदानंद थरवळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाने शिंदे गटातून आलेल्या दीपेश म्हात्रेना डोंबिवली विधानसभेसाठी तिकीट जाहीर केले. त्यामुळे थरवळ हे नाराज आहेत. निष्ठावंतांना वगळल्याने त्यांनी कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला डोंबिवलीत धक्का बसला.