बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

लेकरा नागराज,, अरे काय केलेस तू,,, न भूतो न भविष्यतो,…..लेखक कैलास साबळे ….

अमित जाधव-संपादक

लेकरा नागराज,,
अरे काय केलेस तू,,,
न भूतो न भविष्यतो,,
अर, बाबा, बरगड्या बाहेर निघालेल्या कुपोषित पोरांच्या छाती ही 56 च्या केल्यास,,
चित्रपटाच्या जन्मापासून आजपर्यंय कोनाची हिम्मत झाली नाही,, ,, त्या बॉलिवूड मध्ये तू, बाबासाहेबांची जयंती दाखवलीस, देशाची आर्थिक राजधानी मुंबई, त्यात रॉयल महागडी संस्थान चित्रपट, यांची मक्तेदारी तू तोडलीस,,, अरे बहुजनांना आधीच तुझी भुरळ होती, हाडाचा जिद्दी तू, जातीव्यवस्थेवर आधी दगड भिरकावलास, आणि आता तर बॉलिवूडच्या बापाला सार्वजनिक हात जोडायला लावलेस,, ,चित्रपट सृष्टी पालथी केलीस की रे बाबा,,फुले शाहू आंबेडकरी एकदाच दर्शवलेस, तुझ्यावर प्रेम करावे की जीव ओवाळुंन टाकावा,, सिनेमा चे नाव ही *झुंड* मोठे मोठे स्टार घेऊन विदेशात चित्रीकरण करून, *लेकींच्या देहाचे प्रदर्शन करून, व्यावसायिक चित्रपट बनवणारे आम्ही अनेक पाहिले, परंतु लेकिंचा आदर, त्यांचे हक्क आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे धाडस तूच केलेस*,,
ज्यां झोपडपट्टी कडे आमचीच शिक्षित अवलाद थोडे पैसे आले की तिरस्कार करते , त्याच झोपडपट्टीतील मोक्कार पोरांना घेऊन तू नशेच्या विळख्यातून बाहेर पडन्याचा संदेश देऊन त्यांना व्यसनाधीन करतोस,, अरे अवलिया,, *हिंदी चित्रपटातील महानायक घेतलास तू, पण त्यालाही बच्चनगिरी करू दिली नाहीस ना रे*,,..
एका दृष्यामध्ये मोटोरसायकलच्या पेट्रोल टाकीला शेंदूर लावून दुकान मांडणाऱ्याना तू अलगद उघडे पाडलेस,, ही सत्य परिस्थिती दाखवण्याची हिम्मत फुले शाहू आंबेडकरी लेकरुच करू शकते हे तू दाखवून दिलेस,, बॉलिवूड मध्ये पोक येऊ पर्यंत वाकून काम करावे लागते,,तू वाकायला आणि वागायला लावलेस की,, मराठीच्या फँड्री पासून जातिवादी विरोधाचा हातात घेतलेला दगड , आणि झुंड मध्ये फुटबॉल च्या माध्यामातून झोपडपट्टीच्या पोराकडून लाथाडायला लावलास, , बहुजनांची दीक्षाभूमी जगाला दाखवताना जितका आनंद तुला झाला असेल तितकाच आम्हाला ही झाला, झुंडचे पोस्टर दाखवल्या पासून आजपर्यंत देशभरात *नागराज* हेच नाव सगळीकडे सुगंध पसरवत आहे, , गेल्या चार वर्षांत तू आणि तुझ्या झुंड ने घेतलेली मेहनत, संघर्ष, अतोनात कष्ट, अडथळे, या सगळ्यावर विजय प्राप्त केलास, अनावधानाने आमच्यात तू घर करून घेतलंस,*तुझ्या आंबेडकरी सुरातील हलगीचा आवाज आसमंतात गुंजवलास, असमान होतेच निळभर, तू चित्रपटसृष्टी निळी केलीस*, ,.
*फँड्री* च्या *नाळे* तुन बहुजनांची *झुंड* तयार करून जातव्यवस्थेला सैराट केलेस, लेकरा नागराजा,,

कैलास साबळे
दि पँथर टाईम्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे