बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राजे आता आपण हवे होता….

अमित जाधव-संपादक

लेख राजे आता आपण हवे होता

मुलींनी जीवनात अनेक घटना घडतात त्याला धैर्याने तोंड देऊन आत्महत्या हे टोकाचे पाऊल उचलू नये. आपले आयुष्य संपवू नये. आत्महत्या न करता धैर्याने मुकाबला करून झाशीची राणी प्रमाणे आयुष्य धैर्याने, शौर्याने जगावे. आपल्या मनातील व्यथा आई कडे मैत्रिणी प्रमाणे सांगाव्या. आई हा सर्वात जवळचा मित्र असतो.आत्महत्या हा टोकाचा निर्णय घेउ नये. थेट आत्महत्या करणे योग्य नाही. मानसिक छळामुळे मुलींना अभ्यास करणे झोपणे अशक्य झाले होते.तेच सारे स्वप्नात येते. मुलींचा लैंगिक छळ मानसिक छळ समाजाने करून नये. आपल्या मुलांना पालकांनी मुलीचा आदर करणे शिकवायला पाहिजे.
दुर्गोत्सव मध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते. एकीकडे दुर्गा पूजा करायची आणि एकीकडे असाह्य स्त्रीची अब्रू लुटायची तिच्यावर बलात्कार करायचा हे योग्य नाही. तुम्ही गिधाडे गिधाडे आहात,बलात्काऱ्यांनो का करतात स्त्रियांवर बलात्कार ? बलात्कार करून अत्याचार करून आयुष्यातून कां उठवतात ? स्त्रियांना आयुष्यातून कां उठवतात? असा एकही दिवस बहुदा जात नसावा की वर्तमानपत्रात बलात्काराची अत्याचाराची बातमी नाही. स्त्रियांचा मानसिक छळ समाजाने करू नये.बलात्कार सिद्ध झाल्यास त्या पुरुषांना लगेचच ऑपरेशन करून प्रायव्हेट पार्ट छाटून त्यांना स्री बनवावे. फाशीची शिक्षा देऊन तो मनुष्य या जगातून कायमचा सुटून जाईल.त्यामुळे कोरोना सेवेसाठी ठेवावे,घरी जाऊच देऊ नये.बलात्कारी नराधमांना चाबकाचे फटके मारले काय? मिरचीची धुरी दिली काय काही फरक पडणार नाही ? चाबूक फटके मारुन आलेल्या रक्तावर मीठ चोळले काय? अशा राक्षसी वृत्तीच्या माणसांना काही फरक पडणार नाही.त्यापेक्षा फाशी न देता अशा व्यक्तींना बेशुद्ध न करता जिवंतपणी प्रायव्हेट पार्ट छाटावा. आणि त्याचे ऑपरेशन करून त्यांना स्री बनवावे. बलात्कार्यांना काही वर्षाची सजा होऊन ते परत आल्यावर ते सुड बुद्धीने अजून असे बलात्काराचे प्रकार करणार नाहीत याची खात्री कोण देईल?
ही शिक्षा भलेही कठोर वाटत असेल पण तसे केले तरच या बलात्काऱ्यांना करणाऱ्यांना आळा बसेल. आणि महिला सर्वत्र रात्री अपरात्री सुरक्षित फिरू शकतील.असे कठोर कायदे शासन जर करणार नसेल,तर मग स्त्रियांना स्व संरक्षणासाठी हत्यार बाळगण्याची परवानगी तरी कायद्याने देण्यात आली पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज आता असते तर स्त्रियांचे लैंगिक छळ झाले नसते,तर अशा बलात्काराच्या घटना महाराष्ट्रातच काय देशात सुद्धा झाल्या नसत्या, कोणाची हिंमतच झाली नसती असे कृत्य करण्याची.राजे आता आपण हवे होता. तर त्यांना कडक शासन केले असते.
आत्ताची परिस्थिती बदलल्याने म्हणूनच म्हणावेसे वाटते ,मुलींना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी काद्याने द्यावी,

-श्री.सुभाष शांताराम जैन, ठाणे.
साईनाथ सोसायटी, वर्तक नगर, ठाणे
४००६०६.
पत्रकार,कवी, लेखक, छायाचित्रकार.
मो.९८२१८२१८८५व्हा.८७७९३४८२५६.
६५वय पुर्ण.जेष्ठ नागरिक.
दि.२२/२/२२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे