दिव्यात मरणही झालंय माहाग,अंत्यविधीसाठी देखील हजारो रुपये,भाजपा दिवा शहर युवा मोर्चा अध्यक्ष श्री सचिन रमेश भोईर यांचे ठाणे महापालिकेला अंत्यविधी साहित्य मोफत करण्याचे निवेदन…
अमित जाधव- संपादक
सहा ते साडेसहा लाख लोकसंख्या असलेल्या दिवा शहरातील सामान्य लोकांना मरणानंतरही अंत्यविधीसाठी मयताच्या नातेवाईकांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. सर्वांनाच ही रक्कम परवडणारी नाही, दिव्यात राहणारा रहिवाशी हा सामान्य नागरिक आहे, कुठे तरी सर्व सामान्य लोकांची होणारी ही परवड लक्षात घेता सचिन भोईर ह्यांनी ज्या प्रकारे इतर महापालिकेत अंत्यविधी सामुग्री मोफत दिली जाते त्याच प्रकारे दिवा शहरात सुद्धा अंत्यविधी साठी लगनारी सामुग्री दिवा शहरातील स्मशान भूमी मध्ये मोफत देण्यात यावी म्हणून ठा.म.पा. आयुक्त अभिजित बांगर व दिवा प्रभाग समितीचे सहाय्य्क आयुक्त प्रीतम पाटील ह्यांच्याकडे पत्र देण्यात आले व लवकरात लवकर सदर बाब दिवा शहरातील स्मशान भूमी मध्ये राबविण्यात यावी अशी विनंती केली.. सदर पत्र देताना ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय भोईर, मंडळ सरचिटणीस, समीर चव्हाण, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, गौवरव पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते…