Breaking
ब्रेकिंग

ठाण्यातील दोन मुलं व पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ठाणे पोलिसांनी हरयाणातून मोठया शिताफीने केली अटक..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

ठाणे..दिनांक २१/१२/२०२३ रोजी सौ. भावना अमित बागडी वय-२४ वर्षे, कु. अंकुश अमित बागडी वय-०८ वर्षे, कु. खुशी अमित बागडी वय-०६ वर्षे यांचा मयत महिलेचा पती अमित धर्मवीर बागडी याने घरगुती कारणावरून शिंगे चाळ कासारवडवली गाव ठाणे येथे ” क्रिकेटच्या लाकडी बॅटने डोक्यात घाव घालुन ” अत्यंत निर्घणपणे खुन करून फरार झाला होता. त्याबाबत कासारवडवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नंबर. ४१८/२०२३ भादवि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर बाब अत्यंत संवेदनशील असल्याने गुन्हयाची तिव्रता लक्षात घेवुन मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. श्री. पंजाबराव उगले सो., मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री शिवराज पाटील व मा. सपोआ (शोध – १) गुन्हे श्री निलेश सोनवणे यांनी गुन्हे शाखेतील घटक – ५ वागळे, खंडणी विरोधी पथक, मालमत्ता कक्ष, मध्यवर्ती कक्ष यांचेकडील आठ पथके तयार करून वेगवेगळया ठिकाणी आरोपीचे शोधकामी रवाना केली होती.
सदर तपास पथकांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्हि फुटेज पडताळुन तांत्रीक तपास करून आरोपीचा मागोवा घेवुन तपास केला असता सदर आरोपीत हा हरयाणा राज्य येथे पळुन गेल्याची शक्यता वर्तवल्याने गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास घोडके यांनी मा. वरिष्ठांच्या आदेश व मार्गदशना प्रमाणे सदर ठिकाणी सपोनिरी अविनाश महाजन व पोउपनिरी तुषार माने यांची वेगवेगळी दोन पथके तयार करून तात्काळ रवाना केली होती. गेलेल्या तपास पथकांनी आरोपीचा जिल्हा-हिसार राज्य- हरयाणा येथे कौशल्यपुर्ण शोध घेत असताना आरोपी अमित धर्मवीर बागडी यास हिसार, राज्य-हरयाणा येथुन शिताफीने चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे सो, मा. पोलीस सह आयुक्त श्री. दत्तात्रय कराळे सो, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. श्री. पंजाबराव उगले सोा, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. शिवराज पाटील व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध- १), गुन्हे श्री. निलेश सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे घटक – ५, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विकास घोडके, सपोनिरी भुषण शिंदे, सपोनिरी. पल्लवी ढगेपाटील, सपोनिरी, अविनाश महाजन, पोउपनिरी तुषार माने, पोउपनिरी सुनिल अहिरे, पो. हवा/रोहीदास रावते, पोहवा / सुनिल निकम, पोहवा/ जगदीश न्हावळदे, पोहवा / माधव वाघचौरे, पोहवा / सुनिल रावते, पो.ना/तेजस ठाणेकर, पोना/उत्तम शेळके, पोशि/ यश यादव या पथकाने तसेच गुन्हे शाखेतील वपोनिरी आनंद रावराणे, वपोनिरी योगेश आव्हाड, सपोनिरी सुनिल तारमळे, सपोनिरी भुषण कापडणीस या पथकाने केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे