दिवा-आगासन रोडवरील साईबाबा-म्हसोबा नगर मधील पाईपलाईनचे लवकरच लोकार्पण, मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते वॉल फिरून वॉशआऊट करण्यात आले,म्हसोबा नगर,साई बाबा नगर व दातिवलि स्टेशनच्या परिसरातील नागरीकांना येत्या दोन तीन दिवसात सुरळीत पाणीपुरवठा होणार – मा.उपमहापौर रमाकांत मढवी
अमित जाधव - संपादक
दिवा-आगासन रोडवरील साईबाबा-म्हसोबा नगर मधील पाईपलाईनचे लवकरच लोकार्पण.
ठाणे, दिवा ता 4 एप्रिल : दिवा-आगासन रोडवरील साईबाबा नगर, म्हसोबा नगर ते दातीवली रेल्वे स्थानकादरम्यान नुकत्याच दोन नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली होती. सदर दोन्हीही पाईपलाईनचे आज वॉश आऊट करण्यात आले. अनेक वर्षपासून दिवा आगासन रोडवरील साईबाबा नगर व म्हसोबा नगर पासून दातीवली रेल्वे स्टेशनच्या दरम्यानच्या रहिवासीयांची पाणी समस्या आता मिटली असून दोनतीन दिवसात व्यवस्थित पाणी पुरवठा सुरु होणार असल्याचे मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांनी अनेक स्थानिक महिलांच्या उपस्थित स्पष्ट केले आहे. प्रसंगी दोन्हीही पाईपलाईन वॉशआऊट करून स्वच्छ पाणी येते कि नाही याची खात्रीही करण्यात आली.
प्रसंगी स्थानिक मा. नगरसेविका दर्शना म्हात्रे, सुनीता मुंडे व मा. नगरसेवक दीपक जाधव यांच्यासह चरणदास म्हात्रे, अरुण म्हात्रे, शशिकांत पाटील, शिवसेनेचे सर्व स्थानिक शाखाप्रमुख व उपविभाग प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी सर्व स्थानिक रहिवासी महिलांनी मा. उपमहापौर रमाकांत मढवी व सर्व नगरसेवकांचे आभार मानले.