बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

आर टी ई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२३-२४ प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय…

अमित जाधव - संपादक

दि. ०३ मे २०२३ ठाणे वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ १ ली ते ८ वी पर्यंतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी RTE अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत सन २०२३-२४ ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात आर.टी.ई. २५ % प्रवेशासाठी दिनांक ०५/०४/२०२३ रोजी लॉटरी ची प्रक्रीया राज्यस्तरावरून पुर्ण करण्यात आली असुन सदर लॉटरी निवड यादीमध्ये (Regular Selection) मध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण १०९९६ अर्जांची निवड झाली असून अद्यापपर्यंत केवळ ५१८५ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी दिनांक ०८/०५/२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पालकांनी ऍडमिट कार्ड तसेच हमी पत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका /महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून विहित कालावधीत दिनांक ०८/०५/२०२३ पर्यंतच आपला प्रवेश निश्चित करावा तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त SMS वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील. प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका / मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. प्रवेशासाठी जाताना RTE PORTAL वर पालकांसाठी दिलेल्या खालील सूचनांचे पालन करावे.
१. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.
२. ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा.
३. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे