ब्रेकिंग
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे नवीन पक्षाची स्थापना करुन निवडणूक लढवणार…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे नवीन पक्षाची स्थापना करुन निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रीय जनहित नावाच्या पक्षाची स्थापना करुन वर्सोवा मतदारसंघातून संजय पांडे निवडणूक लढवणार आहेत. 15 ऑगस्टनंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करु, अशी माहिती संजय पांडेंनी दिली. आमची विचारधारा धर्मनिरपेक्ष असेल, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आमची भविष्यात आघाडी होऊ शकते, असा विश्वासही यावेळी पांडेंनी व्यक्त केला.
0
2
0
9
7
4



