Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थांना देण्यात येणा-या चिक्यामध्ये अळ्या….

0 2 0 9 7 9

ठाणे महापालिका शाळेतील
विद्यार्थांना देण्यात येणा-या
चिक्यामध्ये अळ्या….

ठेकेदारावर गुन्हा दाखल
करा  काँग्रेसची मागणी….

http://https://drive.google.com/file/d/1geimF7i8KY5je8SHI4z2bwgoex6YKwoP/view?usp=drivesdk

ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी देण्यात येणा-या चिक्क्यामध्ये अळया आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या चिक्या पुरवठा करणा-या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याची सर्व देयके थांबवण्यात यावी अशी मागणी ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.*

ठाण्यातील महापालिकेच्या ठाणे शहरात दोनशेच्या वर शाळा आहेत या शाळेतील 40 हजार विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी चिक्या दररोज दिला जात होत्या, कोविड कालावधीत शाळा बंद झाल्या होत्या म्हणून याचा पुरवठा बंद झाला होता यावेळी राजकीय हस्तक्षेप करून या चिक्यांचा आठवडय़ातून एकदा पुरवठा करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने सुधारीत निर्णयाने घेतला वास्तविक याबाबत कालच्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अॅड.विक्रांत चव्हाण यांनीही याबाबत विषय घेतला होता,सदरचा ठेका हाच बेकायदेशीररीत्या देण्यात आला असून अटीशर्तीनुसार देण्यात आलेला नाहीये असा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे

याचा स्वताचा कारखाना ठाण्यात असला पाहीजे होता परंतु तो कारखाना प्रत्यक्षात सोलापूरमध्ये आहे,ठाण्यातील एका अनधिकृत बंगल्यावर या चिक्क्यांचा सर्व साठा ठेवण्यात येत असून या ठीकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्यामुळेच सदरची घटना घडली असल्याचा आरोप शहर काॅग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे

या ठेकेदाराला ठीककीकाणच्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवास शुल्क देण्यात येत आहे तेही बेकायदेशीर आहे सदरची बाब आता समोर आली असून या चिक्क्यामध्ये आता चक्क अळया आढळून आल्या आहेत याबाबत आयुक्तांची भेट घेऊन या ठेकेदारावर त्वरीत गुन्हा दाखल करावा व त्याची देयके त्वरित रोखण्यात यावी अशी मागणी करणार असल्याची माहिती शहर काॅग्रेसच्या वतीने मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे