दिनांक १४/०७/२०२४ रोजी ०६:३६ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार घटनेची माहिती देणारे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांनी कळवली पहाटे ०४:३० वाजता एका इमारती वरील दिवा पूर्व, दिवा ठाणे याठिकाणी *नवीन प्लाझा (तळ+७ मजली, अनधिकृत इमारत/ ०८ ते १० वर्षे जुने बांधकाम) या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील रुम नं. ७०४ बेडरूम छताचे प्लास्टर पडले होते. *सदर ठिकाणी दोन व्यक्तींना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.सदर घटनेत श्री. अंकित सिंग( पु/ वय २८ वर्षे) यांच्या डोक्याला व उजव्या हाताला दुखापत झाली आहे.तर श्रीमती. सोनम सिंग (स्त्री/२६ वर्ष) त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
सदरची माहिती संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.