दिव्यातील खाडी किनारी वसलेल्या नागरिकांना नोटिसा,भयभीत झालेल्या नागरिकांच्या पाटिशी बाळासाहेबांची शिवसेना – मा.उप महापौर रमाकांत मढवी
अमित जाधव - संपादक
दिव्यातील खाडी किनारी वसलेल्या नागरिकांना नोटिसा,भयभीत झालेल्या नागरिकांच्या पाटिशी बाळासाहेबांची शिवसेना – मा.उप महापौर रमाकांत मढवी
दिवा विभागातील साबे परिसरांत साळवीनगर,साईनगर खाडी किनारी वसलेल्या रहिवाशांच्या पाठीशी खंबीर *बाळासाहेबांची_शिवसेना*
दिव्यामध्ये तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी ठाणे यांचे कार्यालयातून महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ कलम ५०(३) साळवी नगर,साईनगर खाडीकीनारी रुम धारकांना रुम खाली करण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या तेथील जनता भयभीत झाली आहे आज दि.२१/११/२०२२ रोजी सर्व नगरसेवक माजी उपमहापौर रमाकांत मढवी साहेब तसेच ईतर नगरसेवक ,पदाधिकारी यांच्या समवेत तेथील जनतेने आपल्या व्यथा समोर ठेवत आम्हाला आपण दिलासा देऊ शकता. असे उद््गार सुद्धा जनतेतुन निघत होते घरावर कार्यवाही होणार या भितीने भयभीत झालेली जनता व्यथा मांडत होती. त्यावर माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी बोलताना सांगितले की सर्व नगरसेवक विभागप्रमुख व शाखाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहोत आणि तुमची समस्या लवकरच राज्याचे *मुख्यमंत्री_मा_श्री_एकनाथजी_शिंदे_साहेब* व स्थानिक *खासदार_श्रीकांत_शिंदे साहेबां* पर्यत पोहचवुन न्याय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करु अशी ग्वाही माजी उपमहापौर रमाकांत मढवी साहेब , यांनी दिली सोबत नगरसेवक शैलेश पाटील, नगरसेवक अमर पाटील, विभागप्रमुख उमेश भगत, निलेश पाटील,गुरुनाथ पाटील, भालचंद्र भगत, प्रकाश साळवी, अरुण जाधव,सुभाष गजरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते



