बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

आरे पोलिसांच्या हद्दीतमटका किंग सुरेश सट्टा मट्टा मधून करत आहेत लाखो करोडो रुपयाची उलाढाल…! ठिकाणीं बेभान होऊन चालत आहेत सट्टा मट्टा चे साम्राज्य……

अमित जाधव-संपादक

आरे पोलिसांच्या हद्दीतमटका किंग सुरेश सट्टा मट्टा मधून करत आहेत लाखो करोडो रुपयाची उलाढाल…!

ठिकाणीं बेभान होऊन चालत आहेत सट्टा मट्टा चे साम्राज्य यांच्या साम्राज्याला पोलीस हादरा देतील का ?

साहाय्यक पोलीस निरिक्षक आशीष कार्ले करताय तक्रारदारास् दमबाजी

संजय बोर्डे

मुंबई माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची चार्ज घेताच मुंबई मधील सट्टा मट्टा चालवणाऱ्याची मटका पंचाईत झाली होती.परंतु मा.पोलीस आयुक्त यांनी सेवा निवृत्ती घेताच मुंबई मध्ये पुन्हा सट्टा मटका,जुगार पुन्हा जैसे थे झालं आहे.

परंतु सत्ता पालट होताच मुंबईमध्ये सट्टा मट्टा माफीयांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सत्ता पालट होताच मुंबई मोठ्या प्रमाणामध्ये मटका किंग चे साम्राज्य पुन्हा प्रस्थापित झाले आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेला आहे.

मुंबईमध्ये आरे मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ५ ठिकाणीं मटका किंग सुरेश याचा सट्टा मट्टा चालू आहे. बऱ्याच लोकांनी,सामाजिक कार्यकर्ते यनी वेळोवेळी जुगार माफिया सुरेश यांच्या विरोधात वेळोवेळी तक्रारी बातम्या प्रसिद्ध करून देखील या मटका किंग सुरेश यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न निर्माण केलेला आहे.

आरे कॉलनी येथील युनिट न ६, फिल्म सिटी गेट सामोरं,आय्यापा मंदिरा जवळ तबेल्याच्या बाजूला,

या ठिकाणी सुरेश हे सट्टा मट्टा चे

साम्राज्य मोठ्या सिताफिने चालवत असून या ठिकाणी दररोज लाखो रुपयाची उलाढाल होत आहे असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या ठिकाणी जर सट्टा मट्टा सुरू आहे मग ही माहिती स्थानिक पोलिसांना अवगत नसावी का? यामुळे स्थानिक पोलिसांवर देखील संशयाने बघितली जाते. या संदर्भात आरे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते संजय बोर्डे यांना आरे पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कारले यांनी धमकावून आणण्याचा प्रयत्न केला. रक्षकंदर भक्षक होतील तर न्याय मागण्याचा कोणाकडे. या संदर्भात पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 सोमनाथ घार्गे व मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना मेल द्वारे तक्रार करण्यात आली आहे.

या ठिकाणी जर कोणी सामाजिक कार्यकर्ता किंवा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता या विरोधात पोलिसात तक्रार करत असल्यास तर तक्रारदाराला धमकवल्या जाते त्यामुळे या ठिकाणी तक्रारदाराच्या जीवाला देखील धोका निर्माण होतो.

महाराष्ट्र मध्ये जुगार बंद असताना सुरेश याचे धंदे राजरोसपणे चालू आहेत.हे तक्रारदाराला धमकून सांगतात आम्ही वरपर्यंत आमचे हफ्ते जातात त्या मुळे आमच्या धंद्याचं कोणी काही वाकड करू शकत नाही त्यामुळे सर्वसामान्य माणूस यांच्या धंद्यावर विरोधात तक्रार करतो तर त्या तक्रारीचा कुठलाही विचार घेतला जात नाही.मग यांच्यावर कारवाई कोण करणार असा देखल प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईमध्ये उद्योग धंदे झपाट्याने वाढत असताना या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण देखील तेवढेच वाढत आहे अवैध धंदे मोठ्या जोमात या ठिकाणी सुरू आहे. मुंबईची शांघाई च्या दिशेने वाटचाल सुरू आहे.या अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.आशा आहे की लवकरात लवकर या जुगार माफियावर कारवाई होईल आणि अवैध जुगाराचे धंदे बंद होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे