Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यामध्येमध्ये पाहायला मिळाला गोविंदाचा थरार ! कार्यसम्राट नगरसेवक शैलेश पाटील यांची सर्वात मोठी दहीहंडी,भाऊ कदम यांनी विशेष उपस्थिती राहून दिवेकरांचा आनंद केला द्विगुणित….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यामध्येमध्ये पाहायला मिळाला गोविंदाचा थरार ! कार्यसम्राट नगरसेवक शैलेश पाटील यांची सर्वात मोठी दहीहंडी….

भाऊ कदम यांनी विशेष उपस्थिती राहून दिवेकरांचा आनंद केला द्विगुणित

कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष दहीहंडी उत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करता आला नाही. परंतु यावर्षी दिवा शहरासह गावागावात दहिहंडी उत्सव जल्लोषात साजरा झाला. दिवा शहरात मा. कार्यसम्राट नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वतीने दिव्यातील सर्वात मोठी मानाची दहीहंडीच डॉ.श्रीकांत शिंदे मित्र मंडळ च्या वतीने आयोजन करून त्यांच्या कार्यालया समोर भव्य स्टेजवर केले होते.तसेच मराठी सिनेसृष्टीचा कॉमेडी बादशाह भाऊ कदम यांचे विशेष उपस्थितीत डीजेच्या तालावर नाचत दिव्यातील नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला.तसेच दिव्यातील व इतर शहरातील असंख्य गोविंदा पथकांनी पाच ,सहा,व सात थरांचे मानवी मनोरे रचत सलामी दिली मा. शैलेश पाटील यांनी गोविंदा पथकांना व नागरिकांना सूचना करत कोणतेही गालबोट न लागता सुरक्षितपणे सणाचा आनंद घ्या असे आवाहन करुन दिव्यातून कब्बड् प्रो सारख्या स्पर्धांमधे दिव्याचे खेळाडू गेले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली . शिंदे – फडणविस सरकारने गोविंदासाठी चांगला निर्णय घेतला असून दहा लाखाचे विमा कवच देण्याची घोषणा केली असल्याचे सांगतले. अनेक गोविंदा पथकास रोख रक्कमेसह कार्यसम्राट नगरसेवक शैलेश पाटील यांच्या हस्ते सर्व गोविंदा पथकांना रोख पारितोष व ट्राॕफी देऊन गौरविण्यात आले. बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून दिवा पोलीसांच्या वतिने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे