ब्रेकिंग
मुंबईत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेच्या भितीने 60 हजार रुपये टाकले बाथरूम मध्ये.. पण
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
मुंबई – अटकेच्या भितीने एका बीएमसी अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे 60 हजार रुपये टॉयलेटमध्ये फ्लश केले. पण यानंतर 57 हजार रुपये ड्रेनेज चेंबरमधून काढून एसीबी पथकाने ते जप्त केले. तसेच या प्रकरणी अधिकारी प्रल्हाद शितोळे या अधिकाऱ्याला अटक केली. एका हॉटेलच्या पीएनजी कनेक्शनसाठी तसेच एक प्रमाणपत्र देण्यासाठी शितोळेने 60 हजार रुपयांची लाच घेतली होती. हे प्रकरण कळताच एसीबीने शितोळेच्या घरावर छापा टाकला होता.
0
2
0
9
7
4



