बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील पोलीस स्टेशन व रस्त्यांच्या विविध समस्ये साठी मानव विकास संरक्षण समिती (नवी दिल्ली)च मुख्यमंत्री यांना निवेदन….

अमित जाधव-संपादक

दिव्यातील पोलीस स्टेशन व रस्त्यांच्या विविध समस्ये साठी मानव विकास संरक्षण समिती (नवी दिल्ली)च मुख्यमंत्री यांना निवेदन

२२\०८\२०२२ रोजी मानव विकास संरक्षण समिती (नवी दिल्ली ) रजि. समिती चे संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुराडे यांनी मुंबई मंत्रालयात जाऊन घेतली महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट तसेच समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने समिती च्या वतीने विजय कुराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. त्या निवेदनात कुराडे यांनी विविध मागण्या मुख्यमंत्री महोदय यांचे कडे निवेदनाद्वारे देण्यात आल्या. त्या मागण्या पैकी कुराडे यांनी दिवा येथे जी पोलिस चौकी आहे त्या चौकी ऐवजी दिवा पोलिस स्टेशन स्थापन करून दयावे. तसेच दिवा पोलिस चौकी पासुन मुंब्रा पोलिस स्टेशन ठाणे ८ किलोमीटर अंतरावर असुन मध्ये खाडी येत आहे. त्यामुळे दिवा येथून मुंब्रा पोलिस स्टेशन येणे पावसाळयात शक्य होत नसुन नागरिकांना तक्रार करणे फार कठीण होत आहे. व यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. हे विजय कुराडे यांनी मुख्यमंत्री महोदय यांचे लक्षात आणून दिले .
तसेच समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष कुराडे यांनी समिती चे वतीने निवेदने देऊन आपल्या ईतर विविध मागण्या मुख्यमंत्री महोदय यांचे समोर मांडल्या त्यामध्ये भिवंडी ते वाडा रस्त्यावर ठिकठिकाणी जे मोठ मोठे खड्डे होऊन रस्त्याची चाळण झाली आहे. निष्कृष्ट दर्जाचा रस्ता बणवणारे ठेकेदार व पाठीशी घालणारे शासकीय अधिकारी यांचे वर त्वरित कार्यवाही व्हावी दिलेल्या निवेदनातुन हि मागणी करण्यात आली. व कुराडे यांनी वाडा येथील *आय टी आय काॅलेज* मधील दुरावस्थेचे मंत्री महोदय यांचे समक्ष कथन करून लवकरात लवकर काॅलेजची डागडुजी करून नुतनीकरण करावे व तिथे अनुपस्थित असणारे शिक्षक वर्ग यांचे वर चौकशी होण्याकामी निवेदन दिले. व रोजगार मंत्री यांना समिती मध्ये कार्यरत असणारे समिती सभासद यांना रोजगार सरकार व शासन यांचे कडून उपलब्ध करून देण्यात यावे या करिता निवेदन देऊन कुराडे यांचे वतीने शिफारस करण्यात आली आहे. हभप प्रसिद्ध साईकथाकार बाळकृष्ण महाराज यांनी समिती कडे निवेदन देऊन मागणी केली होती. कुराडे यांनी बाळकृष्ण महाराज यांनी केलेल्या मागणी लवकरात लवकर आमलात यावी यासाठी मुख्यमंत्री यांचे समोर आलेल्या तक्रारी नुसार महाराष्ट्र राज्य हि संतांची कर्म भुमी आहे. त्या महाराष्ट्र राज्यात हि भव्य दिव्य सांस्कृतिक भवनाचे निर्माण करावा. या करिता विजय कुराडे यांनी निवेदन दिले.

मानव विकास संरक्षण समिती संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुराडे यांनी दिलेले सर्व निवेदनाचे अवलोकन करत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती चे वतीने दिलेल्या निवेदनानुसार संबंधित विषयांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी असे आदेश एकनाथ शिंदे यांनी समिती ने दिलेल्या निवेदनावर आदेश पारित करताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सही करून आदेश पारित केले . विजय कुराडे यांनी मानव विकास संरक्षण समिती व व्यक्तीक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हावे या करिता आदेश पारित केले या करिता आभार व्यक्त केले .धन
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे