Breaking
ब्रेकिंग

इंग्रजी माध्यम शाळा मान्यता व दर्जावाढ संदर्भात शिक्षणमंत्री सकारात्मक.* मान्यता नसेलेल्या इंग्रजी माध्यम शाळांवर अन्याय होऊ देणार नाही – सुदर्शनाताई त्रिगुणाईत.

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे ता ७ जून : सध्या अनधिकृत शाळांचा मुद्दा गाजत असताना ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरातील बेकायदेशीर शाळा व २५ हजारांच्या आसपास शिक्षण घेत असलेले शालेय विद्यार्थी व पालकांत द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे. आज मंत्रालयात शिक्षणमंत्री दादा भुसे पाटील यांच्या दालनात शिक्षक व पदवीधर आमदार यांच्याशी शिक्षकांसाठी व इंग्लिश मीडियम स्कूल मान्यता व दर्जा वाढ या विषयावरती सकारात्मक चर्चा झाली सर्व आमदारांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बद्दल सहानुभूती दाखवून पुढच्या आठवड्यात लगेच सभेचे आयोजन करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे

प्रसंगी सचिव, उपसचिव तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सुदर्शनाताई त्रिगुणाईत इंग्लिश स्कूल महाराष्ट्र राज्य अध्यक्षा यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत महाराष्ट्रातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा दर्जा वाढविण्याची सध्याची स्थिती तसेच शाळेला नवीन मान्यता देण्यासाठी योग्यता तसेच शासनाच्या अटी बद्दल महत्वाची चर्चा झाली. प्रसंगी शिक्षणमंत्री दादा भुसे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे असे इंग्रजी माध्यम शाळेच्या महाराष्ट्र अध्यक्षा सुदर्शनाताई त्रिगुनाईत यांनी बोलताना सांगितलं स्पष्ट केल आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे