Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

ठाणे महापालिकेची पाणीपट्टी वसुली मोहिम तीव्र; 16 दिवसांत 14.88 कोटींची वसुली* *पाणीपट्टीवर देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ नागरिकांनी घ्यावा* : *महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन..

अमित जाधव - संपादक

0 2 5 9 9 3

ठाणे (17) : ठाणे महानगरपालिकेकडून पाणीपट्टीच्या थकीत रकमेवरील व्याज/ दंड / प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सुट/ सवलत देणे सुरू असून पाणीपट्टीवरील थकबाकी वसुली मोहिम तीव्र करण्यात आली आहे. दिनांक 1 मार्च ते 16 मार्च 2026 या 16 दिवसांत पाणीपुरवठा विभागामार्फत एकूण 14 कोटी 88लाख 2 हजार 133 रुपये इतकी वसुली करण्यात आली आहे. थकीत पाणीपट्टीवर देण्यात आलेली सवलत 31 मार्च 2026 पर्यत सुरू असून जे नागरिक आपली पाणीपट्टी भरणार नाहीत अशा थकबाकीदारांवर 1 एप्रिल2026 पासून कारवाईची मोहिम अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

या कारवाईत दिवा येथे 202 नळसंयोजन खंडीत करण्यात आली, 28पंप जप्त तर 14 पंप रुम सील करण्यात आले असून 75 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभागसमितीत 155 नळसंयोजने खंडीत करण्यात आली. लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती 63 नळसंयोजने खंडीत करुन एकूण 438 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत 82 नळसंयोजने खंडीत करुन 141 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. उथळसर प्रभाग समिती हद्दीत 19 नळसंयोजने खंडीत करण्यात आली. वर्तकनगर प्रभागसमितीत 12 नळसंयोजने खंडीत करुन 63 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण 533 नळसंयोजन खंडीत करण्यात आली. तर 28 पंप जप्त, 14 पंप रुम सील करण्यात आले असून एकूण 717 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

*प्रभाग समितीनिहाय करण्यात आलेली वसुली*

*माजिवडा मानपाडा प्रभाग समिती : रु. 4,36,64,861*

*नौपाडा कोपरी प्रभाग समिती : रु. 1,69,53,636*

*कळवा प्रभाग समिती : रु 1,74,68,740*

*वर्तकनगर प्रभाग समिती रु. : 1,69,95,630*

*उथळसर प्रभाग समिती रु. 1,52,64,173*

*दिवा प्रभाग समिती : रु 1,20,28,204*

*लोकमान्य/सावरकर नगर प्रभाग समिती : रु 94,18,960*

*मुंब्रा प्रभाग समिती : रु. 52,36,351*

*वागळे प्रभाग समिती : रु. 83,80,059*

याशिवाय नागरी सुविधा केंद्र व इतर माध्यमांतून रु. 33,91,519 इतकी वसुली करण्यात आली. थकबाकीदारांविरुद्ध ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. .

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 5 9 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे