Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यातील कार्यरत 3 हजार 172 प्रगणकांनी 4 लाख 94 हजार 28 कुटुंबांपैकी 1 लाख 41 हजार 418 कुटुंबांचे केले सर्वेक्षण..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे,दि.25 (प्रतिनिधि) :-* महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत सुरु असून सर्वेक्षण करण्याकरिता गोखले इन्स्टिट्यूटमधील तज्ञ प्रशिक्षक (Master Trainer) मार्फत प्रगणक व पर्यवेक्षक यांना तसेच प्रत्येक तालुक्यातील नोडल ऑफिसर, सहाय्यक नोडल ऑफिसर, प्रत्येक तालुकास्तरावर नेमण्यात आलेले प्रशिक्षक, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांना दि. २० जानेवारी २०२४ रोजी प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले तालुकास्तरीय प्रशिक्षकांनी तालुक्यासाठी नियुक्त पर्यवेक्षक (Supervisor) व प्रगणकांना (Enemurators) दि.२१ व २२ जानेवारी २०२४ रोजी तालुक्याच्या ठिकाणी सखोल प्रशिक्षण दिले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात एकूण ३ हजार १६४ प्रगणक व २५८ पर्यवेक्षक असे एकूण ३ हजार ४२२ कर्मचारी सर्वेक्षणासाठी नियुक्त आहेत.
त्यानुषंगाने व आयोगाच्या सूचनांनुसार तालुकास्तरीय नियुक्त पर्यवेक्षक (Supervisor) व प्रगणकांमार्फत (Enemurators) दि.२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील सुरु असलेल्या सर्वेक्षण कामाची आज दि.25 जानेवारी 2024 रोजी पर्यंतची संख्यात्मक माहिती पुढीलप्रमाणे – ठाणे तालुका :- कार्यरत प्रगणक -45, सर्वेक्षण करावयाची एकूण कुटुंब संख्या- 7 हजार 73, झालेल्या सर्वेक्षणाची संख्या- 1 हजार 251, झालेल्या सर्वेक्षणाची टक्केवारी- 17.69
भिवंडी तालुका :- कार्यरत प्रगणक -833, सर्वेक्षण करावयाची एकूण कुटुंब संख्या- 1 लाख 59 हजार 369, झालेल्या सर्वेक्षणाची संख्या- 34 हजार 720, झालेल्या सर्वेक्षणाची टक्केवारी- 21.79
अंबरनाथ तालुका :- कार्यरत प्रगणक – 1024, सर्वेक्षण करावयाची एकूण कुटुंब संख्या- 1 लाख 88 हजार 349, झालेल्या सर्वेक्षणाची संख्या- 46 हजार 770, झालेल्या सर्वेक्षणाची टक्केवारी- 24.83
शहापूर तालुका :- कार्यरत प्रगणक – 553, सर्वेक्षण करावयाची एकूण कुटुंब संख्या- 53 हजार 286, झालेल्या सर्वेक्षणाची संख्या- 13 हजार 527, झालेल्या सर्वेक्षणाची टक्केवारी- 25.39
मुरबाड तालुका :- कार्यरत प्रगणक – 454, सर्वेक्षण करावयाची एकूण कुटुंब संख्या- 50 हजार 354, झालेल्या सर्वेक्षणाची संख्या- 31 हजार 400, झालेल्या सर्वेक्षणाची टक्केवारी- 62.36
कल्याण तालुका :- कार्यरत प्रगणक – 263, सर्वेक्षण करावयाची एकूण कुटुंब संख्या- 35 हजार 597, झालेल्या सर्वेक्षणाची संख्या- 13 हजार 750, झालेल्या सर्वेक्षणाची टक्केवारी- 38.63
अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यात एकूण कार्यरत प्रगणक – 3 हजार 172 असून सर्वेक्षण करावयाची एकूण कुटुंब संख्या- 4 लाख 94 हजार 28, झालेल्या सर्वेक्षणाची संख्या- 1 लाख 41 हजार 418, झालेल्या सर्वेक्षणाची टक्केवारी- 28.63 इतकी आहे.
या सर्वेक्षणाचे काम युध्दपातळीवर सुरु असून तालुकास्तरीय नोडल अधिकारी/ तहसिलदार यांच्यामार्फत दि. ३१ जानेवारी २०२४ अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तरी या सर्वेक्षण कामकाजात नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे