दिव्यातील तरुणाचा धावत्या लोकलमधून मुंब्रा खाडीत पडल्याचा शोध सुरु….
अमित जाधव-संपादक
*⭕️दिव्यातील तरुणाचा धावत्या लोकलमधून मुंब्रा खाडीत पडल्याचा शोध सुरु.*
ठाणे, दिवा (ता,3 मार्च, संतोष पडवळ ) दिवा रेल्वे स्टेशनवर चडल्यावर धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभा असलेला तरुण मुंब्रा स्टेशन येण्याअगोदर तोल गेल्याने मुंब्रा खाडीत पडला.हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला.सतीश तायडे (34 रा.दिवा) असे युवकाचे नाव आहे.त्याचा खाडीत शोध सुरु असताना भरतीची वेळ असल्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने सांगितले.
१ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सतीश तायडे हा आईसोबत लोकलने दिवा ते घाटकोपर असा प्रवास करीत होता.रेल्वेच्या दरवाज्यात उभा असताना सतीशचा अचानक तोल गेला आणि तो मुंब्रा खाडीत पडला.या अपघाताची माहीती समजताच अपघात स्थळी रेल्वे पोलीस कर्मचारी व ठाणे अग्निशमन दलाचे जवानांचे पथक दाखल झाले.हे पथक सतीशचा शोध घेत असताना भरतीची वेळ झाल्यामुळे शोधकार्य करण्यास अडथळा निर्माण झाला.त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते असे आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले.याबाबत अधिक तपास रेल्वे पोलीसांकडून करण्यात येत आहे.