बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या जेनिशाला आर्थिक मदतीची गरज, SMA type ३ हा एक दुर्मिळ आजार ..

अमित जाधव - संपादक

*गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या जेनिशाला आर्थिक मदतीची गरज*

उरण तालुक्यातील बोकडविरा येथील जेनिशा प्रथमेश पाटील (वय २ वर्षे, ४महिने) हिला SMA (spinal muscular atrophy type -३) या गंभीर आजाराने ग्रासले आहे. सध्या तिच्यावर वाडीया चिल्ड्रेन हॉस्पिटल परळ तसेच नायर हॉस्पिटल मुंबई सेंट्रल या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलने जेनिशच्या गंभीर आजार असलेल्या एस.एम.ए या आजाराचे निदान करण्यासाठी ५ कोटी खर्च येणार असल्याचे सांगितले आहे. जेनिशा हिच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. घरची परिस्थिती नाजूक आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने मुलीच्या गंभीर उपचाराचा सर्व खर्च तीचे आई वडिल करू शकत नाही. त्यामुळे आई व वडिल दोघांनीही विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी जेनिशाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.

SMA type ३ हा एक दुर्मिळ आजार आहे. व याच्यावर वेळीच उपचार न केल्यास हा आजार मुलीचे सर्वच अवयव हळूहळू निकामी करू शकतो. हा आजार झालेली व्यक्ति कालांतराने आपली हालचाल बंद करतो. जेवणही कायमचे बंद करतो. अशा या गंभीर रोगाचे वेळीच इलाज करणे गरजेचे आहे. असे डॉ. शिल्पा कुलकर्णी नुरोलॉजिस्ट वाडिया हॉस्पिटल परळ मुंबई तसेच डॉ अल्पना कोंडेकर नायर हॉस्पिटल मुंबई यांनी सांगितले आहे. सर्वांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत सढळ हाताने आर्थिक मदत केल्यास जेनिशाचे प्राण वाचू शकतात. एक चांगले पुण्य कर्म आपल्या हातून होऊ शकते. म्हणून ज्यांना ज्यांना आर्थिक मदत करायचे आहे त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया अकॉउंट नंबर – 30509262966 , IFSC कोड -SBIN0009832 या खात्यावर आर्थिक मदत पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे