Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा बी आर नगर येथे दिवसा ढवळ्या घरफोडी,चोरट्याने कपाट ही फोडले…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिवा (प्रतिनिधी) घरात कोणीच नसल्याचा फायदा घेवून दिवा बी.आर.नगर आकांक्षा हाॅल नजीक असलेल्या तन्वी अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी केली आहे.या घरफोडीत दोन अंगठ्या आणि 9500 रुपयांची रक्कम लंपास केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गावचे समीर जोगळे हे बी.आर नगर,आकांक्षा हाॅल नजीक असलेल्या तन्वी अपार्टमेंट ए विंग या बिल्डींगमध्ये आपल्या पत्नीसोबत गेल्या चार महिन्यांपासून राहत आहेत.हे दोनही दाम्पत्य सकाळी कामानिमीत्त बाहेर पडतात.दरम्यान 17 जून रोजी दोघंही घरात नसल्याचा फायदा त्यांची येण्या जाण्याची रेकी करुन चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने दरवाजाचा कुलुप तोडून रुममध्ये प्रवेश केला.यानंतर त्यांनी कपाटही फोडले.या कपाटात असलेल्या दोन अंगठ्या आणि 9500 रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे रुममधील रहिवाशी समीर जोळे यांनी सांगितले.

याबाबत दिवा बीट पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.दिवसाढवळ्या कुलूप तोडून दागिऩे चोरल्यमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत सी.सी.टिव्हीच्या आधारे चोरांचा थांगपत्ता लागतोय का? किंवा चोरट्यांची टोळी आहे का?  याचा तपास दिवा पोलीस करीत आहे.दरम्यान रहिवाश्यांनी घरफोडी करणार अज्ञात चोरट्यांचा पोलिसांनी तपास करुन कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे