Breaking
ब्रेकिंग

दिवा प्रभाग समिती आयुक्तचं दिवा मनसेने केलं अभिनंदन, फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या आणि त्यांच्या कडून चिरीमिरी घेऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर आक्रमक भूमिका घेत कारवाई…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा शहरातील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने घेतलेल्या भूमिकेनंतर दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे दिवा मनसेने स्वागत केले असून याबाबतीत त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. तसेच फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या आणि त्यांच्या कडून चिरीमिरी घेऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याला तात्काळ बडतर्फ करण्याबाबत आज सहाय्यक आयुक्तांना पत्र देण्यात आले.फेरीवाल्यांच्या प्रश्नावर दिवा मनसे कायमच आक्रमक राहील असे दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, देवेंद्र भगत आणि विभाग सचिव परेश पाटील हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे