Breaking
ब्रेकिंग

शिवसेना दिवा शहर आयोजित दहावी च्या सराव परीक्षेला सुरुवात..पहिल्याच पेपरला दिव्यातील शेकडो विद्यार्थी गेले सामोरे….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा /ठाणे विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षांची भीती दूर करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी दिवा शिवसेना सराव परीक्षा आज १४ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. शिवसेना सराव परीक्षांचे यंदाचे २१ वे वर्ष असून १४ जानेवारी रोजी इंग्रजी, भूगोल-अर्थशास्त्र, २१ जानेवारी रोजी मराठी, इतिहास-नागरिक शास्त्र आणि २८ जानेवारी रोजी बीजगणित, भूमिती विषयांच्या परीक्षा होणार आहेत. एकाच दिवशी सकाळी ११ ते २ आणि दुपारी ३ ते ५ या दोन सत्रांत परीक्षा घेण्यात येणार आहेत.दिव्यातील अजून २५० विद्यार्थी सहभागी होत परीक्षेला समोरे गेले आहेत.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या व माननिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या व शिवसेना मुख्य प्रवक्ते जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आणि शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शिवसेना शैक्षणिक विभाग आयोजित करण्यात आलेल्या एस एस सी सराव परीक्षा २०२४ आज पहिला पेपर अतिशय उत्तमरीतीने पार पडला यावेळी उपस्थित मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांनी शाळेत परीक्षा स्थळी भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मा.नगरसेवक दर्शना चरणदास म्हात्रे,दीपक जाधव,कु.साक्षी मढवी युवा अधिकारी, शशीकांत पाटील, चरणदास म्हात्रे आदी पदाधिकारी हजर होते असे विनोद पाटील सर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे