
शिर्डीत एक माजी पोलीस उपनिरीक्षक (PSI) भीक मागत असल्याचे समोर आले. शिर्डीत पोलिसांनी भिक मागणाऱ्यांवर कारवाई सुरु केली असून काही भिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी यातील एक भिकारी मुंबई पोलीस दलातील माजी PSI असल्याची माहिती समोर आली. किशोर पाटील असे त्यांचे नाव आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते शिर्डीत भिक मागत आहे. किशोर व्यसनाच्या आहारी गेले व वरिष्ठांशी वाद झाल्याने नोकरीचा राजीनामा दिला.