एन पावसात दिवा प्रभाग समिती आयुक्तांचा व मा.उपमहापौर यांचा दिवा शहर दौरा,सखल भागात पाणी भरलेल्या ठिकाणांची पाहणी करून रखडलेल्या रस्त्यांची कामे त्वरित सुरू…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता 3 जुले : काल भर पावसात दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त प्रितम पाटील यांनी आपल्या प्रभाग समितीच्या संपूर्ण टीमसह पावसामुळे अर्धवट रखडलेले रस्त्याची कामे व पावसामुळे सखल भागात साचणारे पाणी यासाठी दिवा शहर दौरा पार पडला. प्रसंगी
कावेरी ज्वेलर्स ते चामुंडा सुपर मार्केट, गणेशनगर
तसेच सावरिया डेअरी ते जय भोले चाळ ( बेडेकर नगर ) येथील काही रस्ते जमीन मालकामुळे रखडलेले आहेत. तर दिवा आगासन मुख्य रस्ता ते रविना बिल्डिंग रस्ता काम प्रगती पथावर सुरु आहे. तसेच म्हसोबादेव नगर ते मुख्य रस्ता दरम्यान शेतकऱ्यांबरोबर बोलणं अंतिम टप्यात सुरु असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसंगी शिवसेनेचे उप. महापौर रमाकांत मढवी, चरणदास म्हात्रे, निलेश पाटील हे विभागप्रमुख तर राजेश पाटील, सदाशिव पाटील हे उप विभाग प्रमुख तसेच गणेश गायकवाड व राजेश पाटील हे शाखाप्रमुख यांच्यासह ठाणे मनपाचे दीपक माने (कार्यकारी अभियंता) अविनाश वसावे (उप अभियंता) अदित्य डावखर (कनिष्ठ अभियंता) दीपक गुजराथी व डोंगर परदेशी (स्वच्छता निरीक्षक) उपस्थित होते.