ठाणे महानगर पालिकेच्या च्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या हस्ते पत्रकार सुभाष जैन यांना शिवसन्मान पुरस्कार….
अमित जाधव-संपादक
ठाणे महानगर पालिकेच्या च्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या हस्ते पत्रकार सुभाष जैन यांना शिवसन्मान पुरस्कार
ठाणे: ठामपा च्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ता, दुनिया मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष, ( दैनिक ठाणे वैभव) छायाचित्रकार , पत्रकार श्री.सुभाष शांताराम जैन यांना शिवसन्मान पुरस्कार सन्मानचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कोकण विभागीय अध्यक्ष श्री.नितीनजी शिंदे व ठाणे शहर उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान 2022व शिव सन्मान 2022 पुरस्कार सोहळ्याचे आयोजन गडकरी रंगायतन ठाणे येथे करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग अध्यक्ष ठाणे जिल्हा नितीन मनोहर शिंदे ,श्री जितेन्द्र पाटील, उपाध्यक्ष ठाणे शहर जिल्हा, कार्यक्रम अध्यक्ष प्रमोद प्रल्हाद इंगळे ,चौफेर वार्ता संपादिका कल्याणी भांगरे,किरण भांगरे साहेब,वर्तकनगर पोलीस स्टेशनचे API सोनी शेट्टी, आणि व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.दैनिक स्वराज्य तोरण संपादक किशोर बळीराम पाटील,
दैनिक जनमत चे संपादक तुषार राजे, ठाणे वैभव संपादक मिलिंद बल्लाळ साहेब कार्यकारी संपादक निखिल बल्लाळ साहेब, दैनिक जनादेश संपादक कैलास म्हापदी साहेब, आवाज माझा चे संपादक सुरेश लोखंडे यांनी सुभाष जैन पत्रकार कवी लेखक छायाचित्रकार समाजसेवक यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.तसेच असंख्य संपादकांनी जैन यांचे अभिनंदन केले आहे.
जैन यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कवि, लेखक, समाज सेवक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे विद्यमान सल्लागार आहेत.माजी सल्लागार कामगार कल्याण केंद्र, वर्तक नगर, ठाणे .चंद्रावर स्वारी बाल काव्य संग्रह पुस्तक प्रकाशित. ३आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. चंद्रावर स्वारी बाल काव्य संग्रह पुस्तकास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे कडून शुभेच्छा पत्र मिळाले. ( २७डिसेंबर २०१६), तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचेही शुभेच्छा पत्र प्राप्त झाले आहे.
सुभाष शांताराम जैन यांनी नेत्रदान , देहदान फॉर्म भरला आहे, चंद्रावर स्वारी बुकगंगाडॉटकॉम वर उपलब्ध आहे. अनेक पुरस्कार प्राप्त ,मुंबई संध्या पुरस्कार, (पत्रकार भूषण पुरस्कार २०१८ पारस काव्यकला जनजागृती संस्था),महाराष्