Breaking
ब्रेकिंग

दिव्यात मुंब्रा काॅलनीतील, जलवाहीनीच्या अपुर्या खोदकामामुळे रस्ते,पाण्याविना नागरिकांची दुर्दशा..!

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 0 8

दिवा शहरातील मुंब्रा काँलनी परिसरात अनेक दिवसांपासून येथील जलवाहीन्यांच्या खोदकामामुळे व पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत.अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटणे,लिकेज असणे,याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.येथे फुटलेल्या पाईपलाईनद्वारे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत असून पाणी इतरत्र पसरुन चिखल होत आहेत.मुंब्रा काँलनीतील लोकवस्ती पाहता येथे अधिकचा पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.परंतु पालिका प्रशासनाकडून या समस्येकडे प्राधान्याने पाहीले जात नाही नसल्याचे दिवा भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपना रोशन भगत यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी ठाणे महानगरपालिकेला लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे.

दिव्यात सर्वाधिक लोकसंख्या मुंब्रा काँलनीत आहे.परंतु येथील अनेक कुटूंबांना पाण्यासारखी प्राथमिक गरज पुर्ण करता आलेली नाही.अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक कुटूंबाना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.ते विकतचे दरही येथील गरीब कुटूंबांना परवडणारे नसल्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे.अश्या कुटूंबांनी जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे पडलेला आहे.
तसेच मुंब्रा काँलनीत सध्या नवीन पाईपलाईनचे काम सुरु आहे.परंतु ते काम अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे.नागरिकांची गरज लक्षात घेता सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण गरजेचे आहे.परंतु चाललेल्या धिम्या कामामुळे नागरिकांना त्याचा नाहक फटका बसत आहे.नागरिकांची पाणी मिळण्याची आश्या धूसर होत चालली आहे.त्यामुळे पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दरम्यान नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष न दिल्यास आम्हाला मोठे आंदोलन छेडावे लागले असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपना भगत यांनी पालिकेला दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे