ब्रेकिंग
बदलापूर प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवर गोळी झाडत केली आत्महत्या…
अमित जाधव - संपादक

बदलापूर प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेने आज स्वतःवर गोळी झाडली असून त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकलींवर अक्षय शिंदेंने अत्याचार केल्याचा आरोप असून तो तळोजा जेलमध्ये होता. कोठडीत असताना त्याने पोलिसांजवळून बंदूक हिसकावली आणि स्वतःवर गोळी झाडली, अशी माहिती देण्यात आली आहे. या घटनेत एक पोलिस कर्मचारीही गंभीर जखमी झाला आहे.