ब्रेकिंग
शिक्षिका, विद्यार्थ्यांनी चिडवल्याने मुलाची आत्महत्या,कल्याण पूर्व कोळशेवाडी परिसरातील 13 वर्षीय शाळकरी मुलगा…
अमित जाधव - संपादक
कल्याण पूर्व कोळशेवाडी परिसरात 13 वर्षीय शाळकरी मुलाने आत्महत्या केली. शाळेत शिक्षिका व विद्यार्थ्यांनी चिडवल्याने विघ्नेश पात्रा नैराश्यात गेला. यातून त्याने घरी कोणी नसताना गळफास घेतला. आई व बहीण घरी परतल्यावर त्यांना विघ्नेश गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. तसेच मुलाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण सांगत कुटुंबाने माझ्यावर रागावू नये. माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल, असे म्हटले.