मुंब्रा -आज दिनांक ०४/०१/२०२४ रोजी १६:०२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे- मुंब्रा अग्निशमन केंद्र)* पारसिक रेतीबंदर खाडी, रेल्वे ब्रिज जवळ, रेतीबंदर, ठाणे (प.) या ठिकाणी पारसिक रेतीबंदर खाडीमध्ये धर्मेंद्र लक्ष्मण डोके (पू./ अंदाजे वय- ४२ वर्षे, राहणार- शिवसाई अपार्टमेंट, पोखरण रोड नंबर-०१, शिवाई नगर, वर्तकनगर, ठाणे (प.) या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता असताना त्वरित सदर घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे कर्मचारी ०१-शववाहिकेसह व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह, व अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यु वाहनासह उपस्थित होते.
सदर घटनास्थळी स्थानिक नागरिक, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनच्या मदतीने खाडीमध्ये आढळलेला मृतदेह बाहेर काढून मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर व्यक्तीचा मृतदेह मुंब्रा पोलीस यांच्या उपस्थितीमध्ये शववाहीकेतून पुढील कार्यवाहीसाठी छ. शि. म. रुग्णालय, कळवा, ठाणे येथे पाठविण्यात आला आहे.