दिव्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना, सामाजिक कार्यकर्ते उमेश मनोहर पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दि.६ – दिव्यात शनिवारी घनघोर शाब्दिक चकमक रंगणार आहे. डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार असून कोकणवासीयांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. येत्या शनिवारी ६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता दिवा पूर्व येथे असलेल्या दातिवली रोड येथील श्लोकनगरमध्ये डबलबारी कार्यक्रम होणार आहे.
सद्गुरू कृपा कन्स्ट्रक्शन आणि श्लोक अपार्टमेंट आयोजित सामाजिक कार्यकर्ता उमेश मनोहर पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कुडाळ येथील अध्यात्मिक शास्त्र बुवा विजय (गुंडू) सावंत विरुद्ध देवगड तालुक्यातील पहाडी आवाज असलेले बुवा संदीप लोके यांच्यात डबलबारीचा सामना रंगणार आहे. ज्या कोकणी माणसांना गावात जाऊन डबलबारी भजन अनुभवता येत नाही त्याच्यासाठी दिव्यात डबलबारीची पर्वणी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे रसिकप्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्री उमेश मनोहर पाटील यांनी केले आहे.



