
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 सालापासून प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी, त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती. आता, केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने 13 कोटी मराठीजनांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. यामुळे काय फायदा होतो ते वाचा.
-अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.