ब्रेकिंग
होली निमित्त कोकणात जाणाऱ्यांना खुशखबर, 11 मार्च पासून विशेष गाडी चालवीण्याचा मध्यरेल्वेचा निर्णय…
0
2
0
9
7
4
दिवा : होळीसाठी दि. 11 मार्च 2025 पासून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. ही गाडी पूणपणे अनारक्षित असेल.
होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाडी संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार दादर रत्नागिरी (01131) होळी विशेष गाडी 11, 13 व 16 मार्च, 2025 दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री 23 वाजून 40 मिनिटांनी ती रत्नागिरीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात रत्नागिरी -दादर होळी विशेष गाडी (01132) दि. 12, 14 तसेच 17 मार्च 2025 रोजी पहाटे 4 वाजू 30 मिनिटांनी सुटून दुपारी 1 वा. 25 मिनिटांनी दादरला पोहोचणार आहे.
एकूण 16 डब्यांच्या या अनारक्षित होळी विशेष गाडीला सर्वसाधारण श्रेणीचे 14 तर सीटीग कम लगेजचे दोन असे डबे असतील.
0
2
0
9
7
4



